Name *
Address *
Email Id *
Contact No. *
Questions
Image Verification
captcha
Please enter the text from the image:
[Refresh Image]
  त्वरीत सल्ल्यासाठी खालील फॉर्म भरा.
 
 
*
*
*
 
 
 
  प्रत्येक अडचणींपासून वाचण्यासाठी युक्त्या आणि सल्ले
 
 
*
*
 
 
 
नविन मासिकाचे अनावरण
०९/०१/२०१२
वास्तुशास्त्रावरील मासिकाचे अनावरण.


’वास्तुरहस्य’ कार्यक्रम

०९/०१/२०१२
वास्तुशास्त्र आणि डाऊझिंग चर्चासत्र कार्यक्रमामध्ये आजच नाव नोंदवा.


जाणून घ्या जानेवारी महिन्यामधील शुभ दिन
०९/०१/२०१२
 
     
 
. एकाक्ष नारळाला विशेष महत्व का असते?
उत्तर: बहुतेक सर्व नारळाला तीन डोळे असतात. क्वचितच एक डोळा असलेला नारळ असू शकतो. एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्याने सांपत्तिक लाभ होतो. म्हणून अशा एकाक्ष नारळाला ’चिंतामणी’ नारळ म्हणतात. असा नारळ फोडत नाहीत त्यास देवघरात व्यवस्थित ठेवून देतात.
. ध्यान-चिंतनाचे महत्त्व का मानले जाते.?
उत्तर: महादेव शंकर असे सांगतात की "मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो. उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा करणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान-चिंतनची आवश्यकता फार असते" म्हणून ध्यानधारणा मननचिंतन याला फारच महत्त्व आहे.
. सर्व जगतामध्ये भगवंत कोणत्या रूपात आहे?
उत्तर: पाण्यामध्ये रस, सूर्य आणि चंद्र यमध्ये प्रकाश, सर्व वेदांमध्ये ओंकार, आकाशामध्ये शब्द, मनुष्यामध्ये पुरुषार्थ, पृथ्वीमध्ये पवित्र गंध, अग्नीमध्ये तेज सर्व प्राणिमात्रांमध्ये जीवनशक्ती, तपस्यांमध्ये तप, सर्व प्राणिमात्रांचे अनादी बीज, बुध्‍दीमान लोकांमधील बुध्‍दी, तेजस्वी लोकांमध्ये तेज, या सर्वामध्ये भगवंत आहे.
. विष्णू, सूर्य आणि शिव यांच्या मंदिरासमोर कधीही घर बांधू नये.
. मंगळवार व रविवार हे दोन वार घर बांधण्याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णत: वर्ज्य करावेत.
. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत.
. आपण नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून दरवाजा बनविला तर ते घरासाठी कलहकारक ठरते.
. कोणत्याही आजारी माणसाने अथवा आजारी माणसास उत्तरेस तोंड करुन बसवून औषध दिल्यास त्याचा आजार कमी होतो. सार्थचरक संहितेमध्ये या संबधीचा स्पष्ट उल्लेख आहे.
. चुकूनसुध्‍दा कोणत्याह प्रकारचे कॅक्टस किंवा काटेरी रोपटे, फ्लॅटमध्ये लावू नये. परंतु एखाद्या इसमास अशा प्रकारच्या रोपटयांची हौस असल्यास अशा व्यक्तीने त्याच्या शेजारी तुळशीचे झाड अवश्य लावावे म्हणजे काटेरी रोपट्यामुळे होणारे वाईट परिणाम तुळशीच्या झाडामुळे कमी होतील .
. वास्तूची आयुमर्यादा काढायची असल्यास घराच्या किंवा इमारतीच्या क्षेत्रफळाला ८ ने गुणून १२० ने भाग दिल्यावर जी संख्या उरते तेवढे त्या गृहाचे अथवा इमारतीचे आयुष्य आहे, असे समजावे.
. काटेरी रोपटी अथवा कॅक्ट्स घरात लावल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्यातरी प्रकारची उद्विग्नता येत असते अथवा बारीक सारीक कारणावरून कुटुंबीयांमध्ये वादंग निर्माण होत असतात आणि म्हणून अशा प्रकरचे काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे.
. ज्याला संतती होत नाही, अशा व्यक्तिला, अश्र्वत्थाला प्रदक्षिणा घालण्यास सांगितल्याचा उल्लेख आहे. थोडक्यात कोणतीही शक्ती प्राप्त करुन घ्यावयाची असेल तर अधिक शक्तीमान अशा अश्र्वत्थाचे पूजन केल्यानेे व त्याला प्रदक्षिणा घातल्याने त्याला यथोचित लाभ प्राप्त होतो. (त्याचबरोबर डॉक्टरच्या सल्ल्याने उपचारही करणे)
. घडयाळ कोणत्या भिंतीवर लावणे योग्य?
उत्तर: घडयाळ ही एक जिवंतपणा दाखविणारी (लिविंग इनटायटी) वस्तू असल्याने पूर्व किंवा उत्तर भिंतीवर ते लावावे. बंद घडयाळे त्वरित दुरूस्त करावीत किंवा बदलावीत.
. बाधित वास्तूसाठी काय उपाय करता येतात?
उत्तर: यामध्ये काही तांत्रिक उपाय करून अशी बाधा दूर करता येते. मात्र त्यापेक्षा श्री सप्तशतीची आवश्यकतेनुसार हवनात्मक नवचंडी किंवा शतचंडी करावी.
. शरीरास अनुकूल व निर्सगास अनुरूप अशी वास्तुरचना ज्या नियमांनी करता येते त्यास वास्तुशास्त्र म्हणतात.
. ज्याप्रमाणे आर्युवेदाच्या नियमातून कायाकल्प होतो. योगशास्त्राच्या नियमातून मनकल्प होतो. त्याचप्रमाने वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास भाग्यकल्प होतो. वास्तुशास्त्राचे नियम हे दिशांच्या गुणांवर अवलंबून असून आपल्या राहत्या घरातील सामानाच्या मांडणीतून या विषयाची प्रचिती येताना दिसते.
. शंभर टक्के गुणसमुच्चयाची वास्तू ही कविकल्पनाच असल्यामुळे सर्वसाधारण ५०%-६०% गुणोत्कर्ष असणारी वास्तु असणे मात्र आवश्यक आहे.
. खाण तशी माती अशी म्हण आपण वापरतो किंबहुना वास्तुशास्त्रीय म्हणीतखाण तशी माती असे म्हणता येईल.
. जोम उत्साहाचे प्रतीक म्हणून सरळ उंच वाढणारा हिरवागार बांबू पूर्व दिशेस लावावा. दीर्घायु व स्वास्थ्याची ती पावतीच आहे.
. एका मोठया संगमरवरी कुंडात उत्तरेस कमळाचे रोप लावावे. त्यामुळे व्यावसायिक ध्येयाप्रत तुमची त्या कमलासमान फुलून वाटचाल होईल.
. क्षणाक्षणाला विद्या मिळवावी आणि कणाकणांनी धन मिळवावे . क्षण वाया गेला तर कुठले धन?
. दारिदर्य आणि मरण ह्यामधून मला मरण आवडते. मरणाची यातना अल्प असते, पण गरिबीची यातना न संपणारी असते . (म्हणून लक्ष्मीची साधना करा)
. दरवाजाच्या डोक्यावर खोबणीत मंगल कलश ठेवल्यास उत्तम आणि ते शक्य नसेल तर बाजारत मंगल कलशाची टाइल बसवावी.
. ज्या व्यक्तींच्या घरात बेलाचा वेल असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.
. यशस्वी होण्यासाठी कर्तृत्वाला आणखी एका गोष्टीची जोड द्यावी बायकोच्या व्यवहारचार्तुयाची (म्हणून मित्रांनो आपल्या बायकोच्या भावभावनांचा थोडा विचार करा. आपल्या संसारात सुखी राहा. हा तोडगा स्वत:च्या अनुभवाने सांगतो)
. स्वयंपाकघर पूर्वेस (त्यातही शक्यतो आग्नेयेस) असावे. सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ एकच असते. तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा संकेत असावा.
. आपल्या घरच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे शतश: खरे आहे. त्यामुळे द्वारवैद्य हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले आहे
’सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये. अशा शब्दात वृक्षायुर्वेदकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात.
. घरमालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये.
. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात अशांनी ’नवनाथ भक्तिसार’ २८ वा ध्याय दररोज संध्याकाळी सातनंतर वाचावा.
. नोकरीधंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात ८ वेळा म्हणून मगच घराचा उंबरा ओलांडावा
ॐ कृष्णाय वासुदेवाय रहये परमात्मने
प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नम: ।
. नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गूळ रस्त्यावरल गायीस खायला द्यावा
. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील ५ वाध्याय घरात दररोज संध्याकाळी ७ नंतर वाचावा.
१०. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत. कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते.
१०. घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते. अन्यथा निदान आठवडयातून किंवा महिन्यातून एकदा तरी करावे.
१०. वर्षातून एकदा तरी घरात उदकशांत करावी.
१०. घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभर्जा घरात राहत नाहीत.
१०. रोज सकाळ-संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे.
१०. लहान मुलांकडून काही नित्य स्तोत्र रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत.
१०. घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवू नका. शक्य तेवढी लवकर त्याची ’योग्य पद्धने विल्हेवाट लावत जा.
. आपल्या स्वत:च्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करुन ठेवावे. दक्षिणेला तोंड करुन गाडी ठेवू नये.
. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत.
. बेडरुमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा. कारण हे रंग प'्रणयाचे आणि समाधानाचे प्रतीक मानले जातात.
. दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत.
. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात. ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे.
. घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक न वाटल्यास पाच सवाष्णींना मानपान करावे व दूध द्यावे . असे केल्याने कटकटी कमी होतील.
. दिवसभरांत सतत जास्तीत जास्त वेळा "हरिओम""हरिओम" म्हणत राहिल्यास बी. पी कमी होतो. "हरिओम" म्हणताना ते ऎकण्याचा प्रयत्न करावा. जास्त फायदा होतो.
. श्रीवेद व्याससुध्दा म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुक्षणी सिद्धान्त आहे.
. अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपती, सरस्वती किंवा इष्ट देवतेची प्रतिमा ठेवावी.
. झोप येत नाही? हा मंत्र बोला (२१ वेळा)
संपुट मंत्र
या देवी सर्वभूतेषु निद्रारुपेण संस्थिता ।
नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नम: ॥
. दरवाजे जीर्ण झाल्यास त्वरीत बदलणे, एखाद्या दरवाजा जीर्ण होऊन कीड लागल्यास त्यामुळे दिशानुरूप घरातील व्यक्तीवर पूर्व ईशान्य पुरुष, उत्तर ईशान्य स्त्री, दक्षिण नैॠत्य स्त्री, पश्चिम नैॠत्य पुरुष, पश्चिम वायव्य स्त्री, पूर्व आग्नेय स्त्री अशा प्रकारे त्यांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरतात
. ज्या वनस्पतीमधून पांढरा चीक येतो अशी झाडे घराभोवती लावू नये.
. "श्री"घरात स्थापून ’श्रीसूक्त’ चा किमान एक पा रोज करावा.
. वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये.
. देवघरात, देवाच्या फोटोबरोबर मृतव्यक्तीचे फोटो ठेवू नये.
. कराग्रे वसते लक्ष्मी:
करमूले सरस्वती ।
करमध्ये तु गोविन्द:
प्रभाते करदर्शणम

अर्थ : हाताच्या टोकावर (बोटांवर) लक्ष्मी असते, हाताच्या मुळाशी (मनगटालगत) सरस्वती असते, तळहाताच्या मध्यावर श्रीगोविन्द असतो. म्हणून सकाळी तळव्यांचे दर्शन घ्यावे.
. मुख्य दरवाज्यास उंबरठा असणे आवश्यक असते.
. एक स्वच्छ मोठी बाली घेऊन त्या बाटलीत शुध्द पाणी भरावे. त्या गोमूत्र, कापूर, हिंग पावडर, वावडिंग पावडर सर्व मिळून मोठे दोन चमचे टाकावेत. हे बाटलीतील पाणी संडास-बाथरूम सोडून सर्व घरात सकाळ-संध्याकाळ शिंपडावे हा प्रयोग ४५ दिवस करावा.
. ज्या नवीन वास्तूस दारे, खिडक्या बसविलेल्या नाहीत अशा वास्तू मध्ये ब्राह्मणभोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये. कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्‍भवतो. ’यमघंट’ योगावर गृहप्रवेश कधीही करू नये.
. वास्तूमध्ये महारुद्र, लघुरुद्र पूजन करावे.
उंबरठयावर लक्ष्मीची पवलं चिकटवू नयेत. करण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं हे काही बरं नाही !
. आपल्या नावाची पाटी सेप्टी डोअर किंवा भिंतीवर न लावता मुख्य दरवाजावरच लावावी.
. आपल्या नवीन घराला जुना दरवाजा बसवू नये (सेकंड हॅंड) असा दरवाजा आपण बसविला तर तो जुन्या स्वामीची इच्छा करतो. आणि सर्वच वास्तुरचनाकारांनी अशा दरवाजाला जोरदार विरोध केलला आहे.
. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा. त्याची हळद कुंकू वाहून पुजा करावी.
 
  पुढे बघा : |  
  ११ वर्षांहून अधिक काळ डाऊझिंग आणि वास्तुशास्त्राचा सल्ला देण्याचा अनुभव तसेच ’वास्तुपंडित’ आणि ’वास्तु विशारद’ यापदव्यांनी सन्मानित.  
     
       
  मोबाइल : ०९८२१३१८५५२
०९८६७४९४६२६
 
  ई-मेल: info@vasturahasya.com  
 
१ वैष्णव निवास,
आकुर्ली क्रॉस रोड नं.२, कांदिवली (पू.) ,
मुंबई - ४००१०१
 
       
  तुम्ही तुमची मते आम्हाला फेसबुक आणि ट्विटर या सामाजिक नेटवर्कींगच्या माध्यमातून कळवू शकता.  
     
  Copyright © Vastu Rahasya. All Rights Reserved   Developed by - Innovins