 |
 |
|
त्वरीत सल्ल्यासाठी खालील फॉर्म भरा.
|
|
|
|
|
|
 |
|
प्रत्येक अडचणींपासून वाचण्यासाठी युक्त्या आणि सल्ले
|
|
|
|
|
|
 |
|
|
 |
|
वास्तुशास्त्राची मूळ कल्पना ही सूर्यमंडलावरून निर्माण झाली आहे. ऊर्जा, ऊर्जेचे संस्करण, दिशांनुरूप
ग्रहादींचा प्रभाव या सार्यांच्याच मुळाशी सूर्यमंडल
आहे व त्यातही सूर्याचा प्रभाव हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. किंबहुना पृथ्वीसहित आपले सर्व ग्रह व
उपग्रह सूर्यापासून निर्माण झालेले आहेत. हे सर्व
सूर्याभोवती फिरत असतात व सूर्यामुळेच अस्तित्वात
आहेत. पृथ्वीवर असणारी जीवसृष्टी ही सूर्यकिरणांच्या
शक्तीवरच जीवित आहे.
निसर्गाची अनेक रूपे वैदिक काळात पुजली, गायली गेली.
देव, मूर्तिपूजा यांपेक्षाही सूर्य, अग्नी, वरुण, इंद्र, मरुत्, उषस् अशा निसर्गाच्या रुपांनाच
देवत्व बहाल केल्याचे दिसून येते.
ऋग्वेदादी ऋचांमध्ये सूर्यदेवता, सविता, आदित्य, मित्र आदी तेजोमय, प्रकाशमय रूपांची अतिशय सौंदर्यपूर्ण
वर्णने आढळतात. या देवतांविषयीची श्रद्धा तसेच
कृतज्ञतेचा भाव ठायी ठायी आढळतो. अंधकाराला छेद
देत अवतरणारी उषा (पहाट), आपल्या तेजस्वी सुवर्णकिरणरुपी
अश्वरथावर स्वार सविता, नभोमंडलात मार्गक्रमण
करणारे प्रकाशमय आदित्यस्वरूप, तेजाने तळपणारी
सूर्यदेवता यांचा वेदकालीन मानवी जीवनावरील प्रभाव ऋचांमध्ये काव्यमयरीत्या वर्णन केलेल आहे. सूर्यस्तुतीपर अत्यंत प्रभावी ’सौरयुक्त’ सूर्यदेवतेच्या १०८ नामांचे 'सूर्य अष्टोत्तरशतनामस्तोत्र' अगस्तीमुनींनी प्रभुरामचंद्रांना कथलेले ’आदित्यह्र्द्यस्तोत्र’ यांच्या पठणाने, जप, अभिषेक याने उत्कृष्ट आरोग्यप्राप्ती होते. मित्र - रवी - सूर्य - भानू प्रभृती सूर्यनामे गुंफून सूर्यनमस्कार घातल्यास व याच मंत्रांनी सूर्यास अर्घ्य दिल्यासही उत्तम आरोग्य लाभते.
ज्या दिशेस सूर्यनारायणाचे अधिराज्य आहे अशा पूर्व दिशेस आरोग्याची, प्रगतीची, उत्साहाची, चैतन्याची दिशा का म्हणतात, हे वेगळे सांगणे नकोच. पूर्व दिशेचेच एक नाव ’प्राची’ आहे. ’प्रा’ म्हणजे प्राणशक्ती आणि ’ची’ धातूचा अर्थ पसरवणे असा आहे. प्राणशक्ती पसरवणारी दिशा ती प्राची असे या दिशेचे नाव किती बरे सार्थ आहे. पूर्व दिशेची अधिकाधिक चांगली फळे मिळणे म्हणजे साक्षात सूर्यनारायणाचाच वरदहस्त लाभण्यासारखे आहे. पूर्वदिशेकडून मिळणारी ही ऊर्जा प्राणिक ऊर्जा म्हणून वास्तुशास्त्रात संबोधितात. पूर्वेच्या प्राणिक ऊर्जेप्रमाणेच उत्तरेकडून दक्षिणेकडे शुभ जैविक ऊर्जा प्रवाहित होते. प्राणिक व जैविक ऊर्जांमुळे अनुक्रमे पूर्व व उत्तर या शुभ ऊर्जायुक्त दिशा ठरतात. ईशान्य दिशा ही पूर्व व उत्तर या दिशांची संगमदिशा असल्याने तेथे अत्याधिक शुभ ऊर्जेचे स्थान आहे. म्हणूनच पूर्व-ईशान्य-उत्तर हा शुभ ऊर्जायुक्त प्रभाग आहे.
याउलट पश्चिम व दक्षिण या दिशा अनुक्रमे प्राणिक आणि जैविक ऊर्जेच्या अस्त दिशा आहेत. नैऋत्य दिशा ही दक्षिण व पश्चिम या दोन दिशांची संगम दिशा असल्याने तेथे अत्याधिक ऋणभारित ऊर्जेचे स्थान आहे. म्हणजेच पश्चिम-नैऋत्य-दक्षिण हा दिशाप्रभाग ऋणऊर्जायुक्त होतो.
पूर्वदिशा मोकळी, हलकी तसेच, जलमय असल्यास वास्तूस अत्याधिक प्राणिक ऊर्जा प्राप्त होते. पूर्वेकडील उतार, अंगण, बगिचा, अधिकाधिक खिडक्या जमिनीलगतच्या खिडक्या यांद्वारे जास्तीत जास्त प्राणिक ऊर्जा लाभते. उत्तम शरीरस्वास्थ्य, मनाची एकाग्रता, चित्ताची प्रसन्नता लाभते. अचूक निर्णय, उत्तम कार्यकुशलता यामुळे प्रगतिपथ आक्रमणास आरंभ होतो. अडथळे आपसूकच दूर होतात की काय असा अनुभव येतो. प्रसन्नता, पावित्र्य, ध्यानधारणा, तेज याची मक्तेदारीच जणू काय या दिशेने घेतलेली आहे . नित्याची महत्त्वाची कामे करताना, अभ्यास, स्वयंपाक, ध्यानधारणा, पूजा-अर्चा, महत्त्वाच्या मिटींग्ज, मुलाखती देताना पूर्व दिशेकडे तोंड करण्यास सांगणे यामागे या दिशेचे सूर्यमय, उगवतीचे असणे, अंधकारातून प्रकाशाकडे जाणारे असणे, अज्ञानातून ज्ञानाकडे, तेजाकडे झेपावणारे असणेच अभिप्रेत आहे.
याउलट पूर्व दिशा बंद असणे, या दिशेस चढ असणे, पर्वत असणे, खिडक्या आकाराने लहान असणे, पूर्वेस टॉयलेट असणे, पूर्वेकडील जिन्याने या दिशेस जडत्व येणे, पूर्वेला Overhead टाकी, माळा, भिंतीवरील जड कपाटे, अवजड यंत्रे, सामान, जड फर्निचर यांमुळे पूर्वेच्या प्राणिक ऊर्जाप्रवाहांमध्ये बाधा येते. शरीरस्वास्थ्यावर व मन:स्वास्थावर विपरीत परिणाम होऊन अवनीती चालू होते.
वरील विवेचनावरुन सहज स्पष्ट होते की उगवत्या सूर्याची प्रशस्त सूर्यकिरणे आपल्यास व आपल्या वास्तूस लाभण्याकरिता प्रयत्नशील राहिले पाहिजे.
आम्ही तुमच्या घराशी वा वाणिज्य क्षेत्राशी संबधित त्वरित परिणाम आणि प्रभावी तोडग्यांसाठी वास्तु मार्गदर्शन करतो.
वास्तू विषयक सल्ल्यांशी निगडीत क्षेत्रे
- घर, कार्यालय, कारखाने, हॉटेल, फार्म हाउस याकरीता वास्तुमार्गदर्शन
- नवीन घर, वाणिज्यक गुण किंवा भूखंड खरेदी करताना वास्तुमार्गदर्शन
- व्यवसायामध्ये यश, अभ्यासात सुधारणा, वैयक्तिक सुधारणा, कौटुंबिक सामजस्य आणि चांगल्या स्वास्थ्याकरिता वास्तुमार्गदर्शन
- वित्तीय संकट टाळण्यासाठी, वैवाहिक समस्या, कौटुंबिक समस्या, तरुण मुलां-मुलींच्या लग्नामधील अडथळे, व्यवसायामध्ये अपयश या करिता वास्तुमार्गदर्शन
|
|
|
|
|
|
|
|